Saturday 6 August 2016

Events at Dept of SSAC











Dr. V.D.Patil  Head, Soil Science and Agricultural Chemistry,VNMKV,Parbhani
addressing delegates in National Seminar on Future of Agriculture organised by
Dr.BAMU,Aurangabad in collaboration with State Dept of Agriculture,M.S. 
on 11-12 Aug.2016





वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग राज्यशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात पाच दिवसांचे राज्यस्तरीय माती तपासणी या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक 5 जुलै रोजी संपन्न झाला. समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके तर विभाग प्रमुख तथा प्रशिक्षणाचे संचालक डॉ. व्हि.डी. पाटील, प्रा. डॉ. सय्यद ईस्माईल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, माती परिक्षणाधारे खतांचा मात्रा दिल्‍यास शेतक-यांचे उत्‍पादन वाढण्‍याबरोबरच अनावश्‍यक खतांचा वापर कमी होतो, यासाठीमातीचा नमुना योग्यरित्‍या गोळा करणे व प्रयोगशाळेत नमुन्याचे पृथकरण करुन शेतकऱ्यांना खतांची शिफारस पत्रिका वितरीत करणे यामध्ये अशा प्रशिक्षणाचा उपयोग होतो. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील यांनी माती परिक्षाणाचा उपयोग जमिनीचे आरोग्य्‍ा विषयक समस्यांची उकल करण्याकरीता प्रशिक्षणांर्थींनी करावा, असे आवाहन केले. प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणाचा अनुभव मनोगताव्दारे व्यक्त केला. तर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षनार्थींना प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुरेश वाईकर यांनी केले. सुत्रसंचलन डॉ पपिता गौरखेडे  आभार प्रदर्शन डॉ महेे देशमुख यांनी केले. सदरिल प्रशिक्षण विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सुरेश वाईकर यांनी प्रशिक्षण समन्वयक म्‍हणुन काम पाहीले. प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील आठही जिल्हातील आठरा तंत्र अधीकारी व तंत्रज्ञ, कृषि सहाय्यक यांनी सहभाग नोदंविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. सदाशिव अडकीणे, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, प्रा. अनिल मोरे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केलेे. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक व पदव्यत्तर विद्यार्थी यांची उपस्थीती होती.




प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके प्रशिक्षनार्थींना मार्गदर्शन करताना 
___________________________________________________________

शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण प्रशिक्षनार्थींना मार्गदर्शन करताना
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन 
आणि प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद (रामेती) यांच्या संयुक्‍त विद्यमाने मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात दिनांक 1 ते 5 ऑगस्‍ट दरम्‍यान पाच दिवसांचे राज्यस्तरीय 
माती तपासणी व विश्‍लेषण या विषयावर प्रशिक्षणकार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले 
असुन दिनांक 1 ऑगस्‍ट रोजी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशो ढवण यांच्या 
हस्ते उदघाटन करण्‍यात आलेव्‍यासपीठावर प्राचार्य डॉ. विलास पाटील,रामेती प्राचार्य श्री. उदय नलावडेविभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरेकार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश वाईकर
आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण 
म्‍हणाले की, माती तपासणी प्रयोगशाळेत कार्य करण्यासाठी महिलांना मोठी संधी आहे.
प्रयोगशाळेतील नियोजन आणि बारकावे याचे ज्ञान महिलांना मुळातच अवगत असते. 
प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी जमिनीच्या गुणधर्मांचा व इतर अन्नद्रव्यांचा असलेला 
परस्पर संबंध आणि त्यांचे माती परीक्षणातील महत्व यावर मार्गदर्शन केले.  
प्रास्ताविकात डॉ. सुरेश वाईकर यांनी प्रशिक्षणाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन
डॉ. पपिता गौरखेडे तर आभार डॉ. महेश देशमुख यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणात 
कृषि विभागाच्या प्रयोगशाळेतील विविध अधिकारी व कर्मचारी यांना प्रयोगशाळेत माती 
तपासणी व विश्‍लेषण प्रशिक्षणव्दारे शिकवले जाणार असुन मिनीच्या विवि गुणधर्मांचे
बौधिक व प्रात्यक्षिकाव्दारे माहीती देण्यात येणार आहे.  मराठवाड्यातील कृषि विभागातुन 
आठ जिल्हातील वीस अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदविला आहे. 
प्रशिक्षणाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले
असुन या लाभ मृद परिक्षण अधिकारी व पर्यायाने मराठवाडा विभागातील शेतकरी बांधवाना
फायदेशीर ठरणार आहे. कार्यक्रम यस्वीतेसाठी डॉ. सय्यद ईस्माईलडॉ अनिल धमकप्रा. गलांडेप्रा. अडसुळडॉ. सदाशिव अडकीणेकर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी सहकार्य
केलेे. कार्यक्रमास प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
_________________________________________________________________

 तेलगंणा कृषि विद्यापीठाच्‍या प्राध्‍यापिका डॉ. पद्मजा यांच्या हस्‍ते प्रशिक्षनार्थीना प्रमाणपत्र वितरीत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग राज्य शासन यांच्या संयक्तविद्यमाने 
मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात पाच दिवसांचे राज्यस्तरीय जमिनीचे गुणधर्म व पाणी 
तपासणी विषयावरील प्रशिक्षण दिनांक १२ ते १६ जुलै दरम्‍याण करण्‍यात आले होते. प्रशिक्षण
कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक १६ जुलै रोजी झाला. 
कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक ढवण हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून  हैद्राबाद येथील प्रो. जयशंकर तेलगंणा राज्‍य कृषि विद्यापीठाच्‍या प्राध्‍यापिका डॉ.जी.पद्मजाविभाग प्रमुख डॉ. व्हि.डी.पाटील, डॉ.अे.पी.सुर्यवंशीडॉ. सय्यद ईस्माईल  
व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.  अध्यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण 
यांनी जमिनीतील  अन्नद्रव्याची घटत असलेली पातळी शेतीसाठी चिंताजनक असल्‍याचे सांगुन 
शेतक-यांसाठी व कृषि विस्‍तारकांसाठी प्रशिक्षण आयोजीत करणे गरजेचे आहेअसे मत व्‍यक्‍त केले.
माती परिक्षणावर आधारीत खतांच्या शिफारशीत मात्राचे शेतक-यांमध्‍ये वापर वाढण्‍यासाठी कृषी 
तंत्रज्ञांना सदरिल प्रकारचे प्रशिक्षणाची आवश्यकता असल्‍याचे मत प्राध्‍यापिका डॉ. पद्मजा यांनी 
 मार्गदर्शनात व्‍यक्‍त केले तर विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी जमीनीच्या गुणधर्मवार 
आधारीत प्रशिक्षण देणारी राज्‍यातील मुख्‍य विद्यापीठ असल्‍याचे मार्गदर्शनात विषद केले.
प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील आठ जिल्हातील तंत्र अधिकारीकृषि सहाय्यक आदींनी 
सहभाग नोंदविला आहे.  प्रशिक्षनार्थी डॉ एच. एस. पवार, श्री पांचाळश्री खजुरीकर आदींनी 
प्रशिक्षणाबाबतचे मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षनार्थीना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र वितरीत 
करण्यात आले. कार्यक्रम विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण संचालक डॉ विलास पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण समन्वयक म्‍हणुन डॉ पपीता गौरखेडे यांनी काम पाहीले. कार्यक्रमाचे 
प्रास्ताविक डॉ. सय्यद ईस्माईल यांनी केले तर  सुत्रसंचलन डॉ. पपिता गौरखेडे व आभार प्रदर्शन 
डॉ. सुरेश वाईकर यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिल धमकडॉ. सुरेश वाईकर
डॉ.महेश देशमुखडॉ. सदाशिव अडकीणे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील 
अधिकारीप्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
तेलगंणा कृषि विद्यापीठाच्‍या प्राध्‍यापिका डॉ. पद्मजा प्रशिक्षनार्थींना मार्गदर्शन करताना
________________________________________________________