संशोधनात जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी मृद शास्त्रज्ञांनी अधिक भर द्यावा....जेष्ठ मृदा शास्त्रज्ञ तथा वाल्मीचे माजी संचालक डॉ. एस. बी. वराडे
वनामकृवित माती व पिकांचे शाश्वत आरोग्य याविषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे उदघाटन

परिसंवादात मान्यवरांच्या हस्ते माजी
कुलगुरू डॉ एस एस मगर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करतांना

मान्यवरांच्या हस्ते मृदगंध पुरस्काराने अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ राजेन्द्र काटकर यांना सन्मानित करतांना
मानवाचे व प्राण्याचे आरोग्य हे मातीच्या आरोग्यावर अवलंबुन असुन जमिनीचे
आरोग्य टिकविण्यासाठी मृद शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनात अधिक भर देण्याची
गरज आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील वाल्मीचे माजी संचालक तथा जेष्ठ मृदा शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. वराडे यांनी केले. भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणीच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात बदलत्या गरजेचे नुसार माती व पिकांचे शाश्वत आरोग्य या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन ७ व ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले असुन परिसंवादचे उद्घाटन दि. ७ ऑक्टोंबर रोजी झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु हे होते. व्यासपीठावर
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु मा. डॉ. शंकरराव मगर हे प्रमुख पाहूणे म्हणून तर शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विलास पाटील, संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, विभाग प्रमुख डॉ
सय्यद ईस्माईल, डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
डॉ. एस. बी. वराडे पुढे म्हणाले की, नदी व नाला सपाटीकरण व खोलीकरण करतांना त्यांच्या नैसर्गिक
प्रवृत्तीचा आपण विचार केला पाहिजे, त्याला वैज्ञानिक आधार असला पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले की, जागतिक
हवामान बदलास नैसर्गिक व मानव निर्मित दोन्ही बाबी कारणीभुत असुन मानव निर्मित
बाबींवर आपण उपाय योजना करून हवामान बदलाची तीव्रता कमी करू शकतो. हवामान बदलाचा
जमिनीच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होत असुन मृद विज्ञान शास्त्रज्ञांनी जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी संशोधनात भर
द्यावा. जमिनीतील सेंद्रीय कार्बन संतुलित राहण्यासाठी आपणास एकात्मिक अन्नद्रव्य
व्यवस्थापनाची कास धरावी लागेल. दीर्घकालीन विचार करता हवामान बदलामुळे भारतातील
भात, गहु, मका, ज्वारी आदी पिकांच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम दिसतील तर हरभरा, सोयाबीन, कांदा, एंरडी आदी पिकांच्या उत्पादनावर सकारात्मक
परिणाम दिसतील. जागतिक तापमान वाढीसाठी कार्बन डॉय ऑक्साईड, मिथेन व नायट्रस ऑक्साईड मुख्य ग्रीन हाऊस गॅसेस जबाबदार आहेत. शेतातील
पिकांचे अवशेष जाळल्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस मोठया प्रमाणात वाढ होत आहे, हेच
अवशेष जमिनीत कूजू दिल्यास जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढण्यास मदत होईल, यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचे त्यांनी
सांगितले.
माजी कुलगुरु मा. डॉ. शंकरराव मगर आपल्या भाषणात म्हणाले
की, कृषि उत्पादन वाढीत मृद विज्ञानाचे मोलाचे योगदान असुन भविष्यातही कृषि उत्पादन
वाढीसाठी मृद विज्ञानातील संशोधन महत्वाचे राहणार आहे. जमिनीची गुणवत्ता टिकविणे
आज आपल्या समोरील मोठे आव्हान आहे, यासाठी युवा मृद शास्त्रज्ञांनी संशोधनात्मक
कार्य करावे, असे सल्ला त्यांनी दिला.
याप्रसंगी मान्यवरांच्या
हस्ते माजी कुलगुरु मा. डॉ. शंकरराव मगर यांना मृद विज्ञान क्षेत्रातील योगदानाबाबत जीवन
गौरव पुरस्काराने संस्थाच्या वतीने गौरविण्यात आले तर अकोला येथील मृदा शास्त्रज्ञ
डॉ राजेन्द्र काटकर यांना 2016 मृदगंध पुरस्काराने
गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ विलास पाटील यांनी केले
तर स्वागतपर भाषण डॉ सय्यद ईस्माईल यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ
पपिता गौरखेडे हिने केले तर आभार डॉ महेश देशमुख यांनी मानले. परिसंवादास राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच भारतीय कृषि अनुसंधान संस्थातील सुमारे 200 शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला
असुन परिसंवादात बदलत्या गरजेनुसार जमीन व पिकांचे शाश्वत
आरोग्य या विषयावर विचार मंथन होणार आहे.
परिसंवाद यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. सय्यद ईस्माईल, सचिव डॉ. महेश देशमुख, उपसचिव डॉ. गणेश गायकवाड, डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. अनिल मोरे, डॉ. आर. एन. खंदारे, डॉ. एस. टी. शिराळे, प्रा. प्रभाकर अडसुळ, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, प्रा. गजभिये, डॉ. सदाशिव अडकिने, संतोष पिल्लेवाड, श्रीमती महावलकर, अजय चरकपल्ली आदीसह पदव्युत्तर विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
परिसंवादात मान्यवरांच्या हस्ते माजी
कुलगुरू डॉ एस एस मगर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करतांना
|
मान्यवरांच्या हस्ते मृदगंध पुरस्काराने अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ राजेन्द्र काटकर यांना सन्मानित करतांना |
I’ve been browsing on-line greater than three hours today, but I never discovered any attention-grabbing article like yours. It is beautiful worth sufficient for me. Personally, if all webmasters and bloggers made good content material as you did, the net will be a lot more helpful than ever before.
ReplyDeleteArchitectural Firms in Chennai
Architects in Chennai
Thank u. In future we further try to improve it.
ReplyDelete