Tuesday 27 September 2016

Memorial lecture


खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नॅनो तंत्राचा वापर महत्वाचा – डॉ. पी. चंद्रशेखरराव

 शाश्‍वत शेतीसाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर यावर आयोजित व्‍याख्‍यानमालेत प्रतिपादन

भारतीय मृदविज्ञान संस्था, नवी दिल्ली व शाखा परभणी तसेच मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग वनामकृवि यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. एन. पी. दत्ता स्मृती व्याख्यान आयोजन कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात दिनांक २७ सप्‍टेंबर रोजी करण्‍यात आले राजेंद्रनगर (हैद्राबाद) येथील जयशंकर तेलंगणा राज्‍य कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्‍ठाता तथा मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखरराव यांनी नॅनो तंत्राचा वापर शाश्वत शेतीसाठी विवीध संशोधनाच्या माहितीच्या चित्रफीतीव्दारे सादरीकरण केले.   कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर माजीमंत्री मा. श्री. सुरेशरावजी वरपुडकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, भारतीय मृदाविज्ञान संस्‍था परभणी शाखेचे अध्‍यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, उपाध्‍यक्ष डॉ. सय्यद ईस्‍माइल आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे उदधाटन दिपप्रज्वलाने संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्‍त‍ाविक डॉ विलास पाटील यांनी केले तर प्रमुख प्रमुख वक्‍त्‍याचा परिचय डॉ. सय्यद ईस्‍माइल यांनी करून दिला.कार्यक्रमात डॉ. विलास पाटील, डॉ. डी. एन. गोखले व डॉ. अनिल धमक लिखित कृषीक्षेत्रातील नवीनतम संशोधन या पुस्‍तकाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.   मा. डॉ. पी. चंद्रशेखरराव पुढे म्‍हणाले की, पीक वाढीकरिता रासायनिक खतांचा वापर करतांना खते प्रत्‍यक्षात कमी प्रमाणात पीकांना लागु होतात, नॅनो खतांचा वापर केल्‍यास रासा‍यनिक खतांचा कार्यक्षमरित्‍या वापर होउुन कमी खत मात्रेत अधिक उत्‍पादन आपण घेऊ शकु, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय समारोपात म्‍हणाले की,  जैवसुरक्षीतता, पर्यावरण अनूकुलता व खर्च परिमाणकारकता आदीच्‍या दृष्‍टीने नॅनो तंत्रज्ञानाचा संशोधनात्‍मक अभ्‍यास करावा लागेल. शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भारतीय मृदविज्ञान संस्‍थेच्‍या वतीने आयोजित करण्‍यात येत असलेल्‍या व्‍याख्‍यानांचा उपयोग नवसंशोधकासाठी मार्गदर्शक आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले आभार डॉ. महेश देशमुख यांनी मानले.

 कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. सुनिल गलांडे, प्रा. प्रभाकर अडसुळ, सदाशिव अडकीणे, एस एम महावलकर, अजय चरकपल्‍ली, शेख सलीम, विद्यार्थी स्‍वप्‍नील मोरे, प्रमोद शिनगारे आदीसह विभागातील इतर कर्मचारी व विद्यार्थ्‍यींनी परिश्रम घेतले.

PCISSS organized Dr.N.P.Datta Memorial Lecture on 27.09.2016
Use of Nanotechnology for sustainable agriculture
Speaker : Dr.P Chandrashekhar Rao,Ex.Dean PJTSAU,Hyderabad

No comments:

Post a Comment